News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

... मनातून ती चव पदार्थात उतरते -शेफ विष्णू मनोहर,मीलेट पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

... मनातून ती चव पदार्थात उतरते -शेफ विष्णू मनोहर,मीलेट पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल - भरड धान्यापासून बनवलेल्या पदार्थाची पाककला स्पर्धा राबवली तर मिलेट धान्य घरोघरी पोहचेल आणि आपला देश अधिक सुजलाम सुफलाम होईल असे प्रतिपादन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खारघर येथे आयोजीत पाककला स्पर्धेवेळी केले. भाजप उत्तर रायगड महिला मोर्चाच्यावतीने रविवारी खारघर येथे मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेचे उद्घाटन जगप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर आणि भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते झाले.या पाककला स्पर्धेत चैतन्य शेवाडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांना उपस्थित मान्यवरांच्याहस्ते पारितोषक देऊन गौरविण्यात आले.
कोणत्याही पदार्थाची चव ही तो पदार्थ बनविणान्याच्या हाताची असते हे जितके खरे तितकेच हेही खरे की पदार्थ बनविणान्याच्या मनातून ती चव पदार्थात उतरते.पाककला म्हणजे रुचकर,चविष्ट आणि पोषक पदार्थ बनविण्याची कला किंवा शास्त्र आहे. ही कला जमायला या कलेचा गोडी लागायला हवी आणि त्याचा ध्यास घ्यायला हवा, कारण कोणताच पदार्थ एकदा करून त्यात प्राविण्य मिळवता येत नाही. तो जेव्हा पुन्हा पुन्हा केला जातो त्याचवेळी त्यातील बारकावे लक्षात येतात आणि मगच तो प्रत्येकवेळी उत्तमोत्तम बनत जातो. त्या अनुषंगाने भाजप महिला मोर्चा उत्तर रायगडच्यावतीने मिलेट अर्थात भरड धान्य पाककला स्पर्धा आणि मार्गदर्शन कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या स्पर्धेत प्रथम क्रमांक चैतन्य शेवाडे, द्वितीय क्रमांक वर्षा शिवणेकर आणि तृतीय क्रमांक कल्पना गुप्ता यांनी पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्याहस्ते बक्षीसे देऊन गौरविण्यात आले. यास्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून ६० हून अधिक पाककला सादर करण्यात आल्या.यावेळी इंटरनॅशनल शेफ विष्णू मनोहर,भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, न्युट्रिशन अंजू प्रसाद, जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, माजी महापौर डॉ.कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत,वर्षा प्रशांत ठाकूर, केंद्रीय समन्वयक संध्या शारबिद्रे आदी उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment