करंजाडे पाणी प्रश्न सोडविला नाही तर जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येईल माजी आमदार मनोहर भोईर यांचा सिडकोला इशारा
पनवेल- महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार,उरण विधानसभा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखाली सिडको पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी राहुल सरोदे यांची भेट घेऊन पनवेलजवळील करंजाडे पाण्याच्या समस्याबद्दल चर्चा केली.माजी आमदार यांनी सिडकोला १५ दिवसांची मुदत दिली आहे आणि त्याची अंमलबजावणी आजपासून करायला सांगितले आहे.जर सिडकोने याची अंमलबजावणी नाही केली, समस्या दूर नाही केली तर शिवसेना स्टाईलमध्ये जनआक्रोश हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे वडघर जिल्हा परिषद विभाग संपर्कप्रमुख प्रदीप म्हात्रे,
विभागप्रमुख नंदकुमार मुंडकर,शहरप्रमुख गौरव गायकवाड,माजी सरपंच रामेश्वर आंग्रे माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी,युवासेना शहर अधिकारी निखिल भोपी,शिवसेना लांजा तालुका सह-संपर्कप्रमुख रमेश आगरे उपशहरप्रमुख,संदीप चव्हाण, युवासेना उपशहरप्रमुख शशांक म्हात्रे, प्रभागप्रमुख वसंत सोनवणे,शाखाप्रमुख किरण दाते, गणपत आंबेकर,युवासेना शाखाधिकारी गौरव पांडे,कुमारी समीक्षा पाथरेउपस्थित होते तर शेकापपक्षाचे उमेश भोईर,केतन आंग्रे, संदीप आंग्रे,अजय आंग्रे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
Post a Comment