पारगावचा पाणी प्रश्न सोडवा : महिलांची जीवन प्राधिकरण कार्यालयावर धडक, खासदार श्रीरंग बारणे यांच्याही दूरध्वनीवरून सूचना
पनवेल - गेल्या वर्षापासून अनियमित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे पारगाव नागरिकांचा विशेषतः महिला वर्गाचा प्रचंड संताप असून पारगावचा प्राणी प्रश्न सोडवा या मागणीसाठी नवीन पनवेलच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयावर पारगावच्या महिलांनी मोठ्या संख्येने धडक दिली.
मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नवीन पनवेलच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी श्री सूर्यवंशी व कार्यकारी अभियंता के.पी. पाटील यांच्याबरोबर दूरध्वनीवर चर्चा करून पारगावचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात सूचना केल्या त्याचबरोबर खासदार श्रीरंग बारणे यांनी या अधिकाऱ्यांना मी या पाणी समस्या संदर्भात जिल्हाधिकारी व पनवेल तहसीलदार यांच्याशी बोलतो असे सांगितले.यानंतर या महिलांनी नवीन पनवेलच्या प्राधिकरणाच्या कार्यालयातील अधिकारी वायदंड यांना भेटून पारगावचा पाणी प्रश्न सोडवावा अशी विनंती केली, त्यावर वायदंड यांनी एक-दोन दिवसात पाणी सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करेन असे आश्वासन दिले.
यावेळी तेजस्विनी किरण म्हात्रे, उज्वला निशांत म्हात्रे, वंदना अरुण तारेकर, प्रगती निलेश म्हात्रे ,जयमला मिलिंद म्हात्रे, कल्पना संतोष पेणकर, चांगुना किसन भोईर ,रेश्मा विलास पाटील ,अरुणा अरविंद केदारी मालती परिषद पाटील ,विनंती विनोद पाटील जागृती राजेश म्हात्रे ,मनीषा गुरुनाथ म्हात्रे ,उषा रविंद्र म्हात्रे, पूजा आकाश म्हात्रे सुवर्णा रोहिदास म्हात्रे, प्रिया रमेश भोईर, तृप्ती जगदीश पाटील, पूजा हरीश केदारे, सुप्रिया सुरेश पाटील, सोनाली मिलिंद म्हात्रे,नंदा दत्ता केदारी, सुभद्रा नामदेव केदारी आधी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
Post a Comment