पनवेल महापालिका ठेकेदारांची निकृष्ट दर्जाची कामे : शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आयुक्तांकडे मागणी
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात महानगरपालिके मार्फत करण्यात येणारी विकास कामे हि ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाची होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या कारभारावर अंकुश ठेवून ठेकेदारांकडून गुणवत्तापूरक कामे करून घ्यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
पनवेल महानगरपालिका प्रशासनाचा अनागोंदी कारभार सध्या सुरु आहे. जे ठेकेदार महानगरपालिकीची ऑनलाईन पद्धतीने कामे घेतात ते स्वतः कामे करीत नाहीत ते इतरांना कमिशन वर कामे देतात. त्यामुळे पनवेल महापालिकेमध्ये समाविष्ट सिडको हद्दीतीलगावांचा विकास कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे वेळोवेळी आवाज उठवण्यात आला परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ठेकेदार आपली पोळी भाजून घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील होणारी कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची असून प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पाठिंबामुळे या ठेकेदारांचे फावले आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात महापालिकेकडून दुर्लक्ष करण्यात येते. नुकतेच एका वर्तमान पत्रात वळवली येथील शाळेच्या विद्यार्थ्यांवर महापालिकेकडून होणाऱ्या दुर्लक्षावर बातमी प्रकाशित झाली होती. त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यामुळे प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारावर अंकुश ठेवून ठेकेदारांकडून तसेच अधिकाऱ्यांकडून गुणवत्तापूरक कामे करून घ्यावी अशी मागणी विश्वास पेटकर यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.
Post a Comment