मुंबई-गोवा महामार्गावरील टोल वसुली थांबविली : टोल मुक्त कृती समितीसह सर्वपक्षीय मंडळींचा आक्रमक पवित्रा
सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव टोल नाका येथे सकाळी ८ वाजल्यापासून टोल वसुलीला सुरुवात करण्यात आली,मात्र सकाळी १० वाजता सिस्टीमधील तांत्रिक बिघाडाचे कारण देत टोल वसुली थांबवण्यात आली.
दरम्यान टोल मुक्त कृती समितीसह सर्वपक्षीय मंडळींनी त्या ठिकाणी येऊन सिंधुदुर्गवासीयांकडून टोल वसुली होऊ देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला. टोल वसुली कंपनीच्या व्यवस्थापकाने स्थानिक प्रश्न प्रलंबित असल्याने लोकांचा विरोध लक्षात घेता टोल वसुली तूर्तास करू शकत नाही असे पत्र महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकांना दिले,ते पत्र टोल मुक्त कृती समितीला दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मात्र, या तात्पुरत्या स्थगितीवर आम्ही समाधानी नसून, टोल वसुली सुरू केल्यास याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू असा इशारा कृती समितीने दिला.
Post a Comment