News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस : पनवेल पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस : पनवेल पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक

पनवेल (संजय कदम) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस यामुळे वारंवार राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. या घटनेचे पडसाद पनवेल शहरात उमटण्याच्या शक्यता लक्षात घेऊन पनवेल पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. याअनुषंगाने शांतता कमिटीची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी सर्वधर्मीय व सर्व पक्षीयांना शांततेचे आवाहन विजय कादबाने यांनी केले आहे.  

कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे. याअनुषंगाने शांतता कमिटीची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी वपोनि विजय कादबाने यांनी काही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तत्काळ पोलीस ठाणे येथे माहिती द्यावी या बाबत सूचना केल्या. 

यावेळी शांतता कमिटीचे सदस्य व सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनोद चव्हाण, पोलीसमित्र चंद्रशेखर सोमण, पनवेल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष इकबाल काझी, माजी नगरसेवक रमेश गुडेकर, अच्युत मनोरे,माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, व्यापारी असोशिएशनचे चित्तरमैल जैन, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे, पराग बालड, जवाद काझी,  पोनि (गुन्हे) प्रमोद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बजरंग राजपूत यांच्यासह गोपनीय विभागाचे अधिकारी संजय धारेराव यांच्यासह शांतता कमिटीचे सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment