आरपीआयच्या रायगड जिल्ह्यातील पूर्वीच्या पदांना नारळ : केंद्रीय मंत्री रामदास आठवले जुलै महिन्यात पनवेलमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार
पनवेल- आरपीआयच्या रायगड जिल्ह्यातील पूर्वीची पदे रद्द केली असून येत्या एक महिन्यांमध्ये नव्याने ही पदे जाहीर करण्यात येणार असून पनवेल जिल्हा शहर प्रमुखपदी प्रभाकर कांबळे यांची नियुक्ती केली असल्याचे आरपीआय आठवले गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी आज कामोठे येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
या पत्रकार परिषदेस आरपीआयचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे, आरपीआयच्या युवक आघाडी महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस विजय मोरे उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले हे २ जुलै २०२३ रोजी आरपीआयच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. आगामी काळातील निवडणूक पाहता नवीन होतकरू कार्यक्षम सदस्यांना पदे दिले जातील असे या पत्रकार परिषदेत आरपीआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी सांगितले.
Post a Comment