कळंबोलीत हवे महानगरपालिकेचे हॉस्पिटल! : प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत स्त्रीशक्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया कदम यांची मागणी
पनवेल- पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली वसाहतीमध्ये लवकरात लवकर पनवेल महानगरपालिकेचे हॉस्पिटल सुरू करावे अशी मागणी स्त्री शक्ती फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा विजया कदम यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात, कळंबोली वसाहतीची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता शासकीय रुग्णालय नाही.प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी मर्यादा येतात.पनवेल उपजिल्हा रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्याचप्रमाणे ते कळंबोलीपासून दूर असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी जाता येत नाही. या आर्थिक वर्षामध्ये कळंबोलीत नव्याने हॉस्पिटल सुरू करण्याची घोषणा महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केली होती. कळंबोलीच्या समाज मंदिरामध्ये कोविड हॉस्पिटलच्या जागेवर महानगरपालिकेचे अत्याधुनिक रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.
याबाबत महापालिकेने त्वरित पावले उचलावीत,तसेच वैद्यकीय सेवेची कळंबोलीकरांना गरज पाहता कळंबोलीमध्ये महानगरपालिकेचे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावे असे निवेदनात 'स्त्री शक्ती फाउंडेशनच्या अध्यक्ष विजया कदम यांनी म्हटले आहे.
Post a Comment