महानगर गॅसने खोदलेल्या खड्ड्यात महानगरपालिकेची फसली गाडी : रस्ते खड्डे मुक्त करा अन्यथा आंदोलन करू राष्ट्रवादीचे राजकुमार पाटील यांचा इशारा
पनवेल- कामोठ्यामध्ये महानगर गॅसने आपल्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात महानगरपालिकेची गाडी फसली आहे. या खड्ड्यांचा येथील नागरिकांना वारंवार त्रास होत असून जर हे रस्ते खड्डे मुक्त केले नाही तर आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटक सचिव राजकुमार पाटील यांनी दिला आहे.
पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे वसाहतीतील सेक्टर 35 मध्ये महानगर गॅसने आपल्या कामासाठी रस्त्यामध्ये खोदकाम केलेल्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेची कचरा वाहतूक करणारी गाडी फसली आहे.याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला असून याबाबत महानगरपालिकेने संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या भागातील सर्वच रस्ते खड्डे मुक्त केले गेले नाहीत तर मात्र आंदोलन उभे करावा लागेल असाही इशारा राजकुमार पाटील यांनी दिला आहे.
कामोठ्यामध्ये महानगर गॅसचा ठेकेदार काम करत असल्या ठिकाणी पालिकेतील कुणाचेही या कामावर नियंत्रण नाही,आम्ही अधिकाऱ्यांना तोंडी याबद्दल विचारणा केली तसेच या भागातील रस्त्याची चाळण झाली आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे,येत्या काही दिवसात हे रस्ते खड्डे मुक्त झालेत नाही तर आम्हाला आंदोलन करावे लागेल.
राजकुमार पाटील,
प्रदेश संघटक सचिव,
राष्ट्रवादी काँग्रेस
Post a Comment