सिडकोतर्फे १५ टक्के पाणी कपात: धरण क्षेत्रात पुरेसा पाणी नाही
धरण क्षेत्रात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने पाण्याच्या नवीन साठ्याची निर्मिती झाली नसल्याने सिडको महामंडळातर्फे सिडको अधिकार क्षेत्रातील नोड आणि गावांत पाणी कपात जाहीर करण्यात आली आहे, या दरम्यान नागरिकांना पाणी जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सिडकोतर्फे सिडको अधिकार क्षेत्रातील विविध नोड गावे आणि हेटवणे पाणीपुरवठा योजना जलवाहिनी मार्गावरील गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो. सिडकोचे हेटवणे धरण, नवी मुंबई महानगरपालिकेचे मोरबे धरण, एमआयडीसीचे बारवी धरण आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पातळगंगा धरण या जलस्रोताद्वारे सिडकोकडून पाणीपुरवठा करण्यात येतो परंतु धरणक्षेत्रात देखील अद्याप पुरेचा पाऊस न झाल्याने पाण्याचा नवीन साठा तयार झाला नसल्याने या सर्व प्राधिकरणांनी पाणी कपात जाहीर केली आहे.
Post a Comment