लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'खाडीवरची माडी' कादंबरीवर पनवेलमध्ये चर्चासत्र
पनवेल- कोकण मराठी साहित्य परिषद, नवीन पनवेल शाखा व के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय,पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक गज आनन म्हात्रे यांच्या 'खाडीवरची माडी' कादंबरीवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्राचे उद्घाटन रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील यांच्या हस्ते होणार आहे तर प्रमुख वक्ते अॅड. साहित्यिका सुनिता जोशी, साहित्यिक
प्रा.अविनाश पाटील, व्याख्याते योगेश लोहकरे, लेखक घनश्याम परकाले,लेखक- पत्रकार सुधाकर लाड उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास आपण उपस्थित राहावे असे संयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.शनिवार दि.१०जून २०३० रोजी सांय.५.३० वाजता ठिकाण- के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय,पनवेल येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
Post a Comment