बेरोजगार तरुण-तरुणींसाठी 'दिबां'च्या स्मृतिदिनानिमित्त २४ जूनला पनवेल येथे रोजगार महामेळावा
पनवेल : प्रकल्पग्रस्तांचे नेते दिवंगत दि.बा.पाटील यांच्या २४ जून या स्मृतिदिनानिमित्त लोकनेते दि.बा.पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल येथे रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.या मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
आगरी समाज मंडळाच्या पनवेल येथील महात्मा फुले सभागृहात झालेल्या लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय बैठकीत रोजगार महामेळाव्याच्या नियोजन संदर्भात चर्चा करण्यात आली.याच सभागृहात हा महामेळावा होणार असून बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही सुवर्णसंधी असेल .
या बैठकीस कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर,माजी खासदार संजीव नाईक, सरचिटणीस दीपक म्हात्रे, सहचिटणीस राजेश गायकर, खजिनदार जे. डी. तांडेल, जे. एम.म्हात्रे, दशरथ भगत, भूषण पाटील, संतोष केणे, दीपक पाटील, डी. बी. पाटील, सुनील कटेकर, अतुल पाटील, रूपेश धुमाळ, सुशांत पाटील, गणेश पाटील उपस्थित होते. बैठकीनंतर आलेले समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी याबाबतची माहिती घेतली.
Post a Comment