भरत पाटील यांची पाचव्यांदा रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी निवड
पनवेल - भरत बुधाजी पाटील यांची पाचव्यांदा रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेता वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी कार्यकारिणी सदस्य मंडळाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये उपाध्यक्ष-शशिकांत शनिवार शेळके,सेक्रेटरी -भालचंद्र गणपत पगडे, सहसेक्रेटरी - केसरीनाथ विनायक पाटील,खजिनदार नंदकुमार दामोदर पाटील, सहखजिनदार-अनिल लक्ष्मण जाधव तर कार्यकारणी सदस्यांमध्ये - मनिषा नामदेव गाथाडे, मनिषा रविंद्र घरत, सुरेखा बळीराम थोरले, अनिता मोहन खुटले,अदिती अरूण म्हात्रे,स्वप्नाली उमेश परदेशी, कृष्णा महादेव भेंडे, गुरूनाथ भाऊ गडगे, राकेश नंदकुमार ठाकरे, विनायक गुरूनाथ जगे, मधुकर बाबु गरुडे आणि सल्लागार म्हणून सुनील पोतदार व कायदेविषयक सल्लागार म्हणून जे.आर.शेख यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
सर्व सदस्यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, संघटनेमध्ये काम करण्याची मनापासून इच्छा आहे अशा दुकानदारांची (व्यक्तींची), संस्थेच्या सर्वसाधारण सभेत अधिक पांच निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात येणार आहे.
Post a Comment