पनवेल तालुक्यातील वलपातील गणेश नगर रस्त्याची दुरावस्था : सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांची ग्रामस्थांच्यावतीने रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
पनवेल : पनवेल पंचायत समितीच्या आडमुठे धोरणामुळे तालुक्यातील वलप गणेश नगर नागरिकांना खड्यातून रस्ताचा मार्ग काढावा लागत आहे. येथील रस्त्याची दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यांना मान, कंबर व पाठदुखीच्या आजाराने ग्रासले आहे. तेव्हा गावासाठी असलेल्या गणेश नगर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी ग्रामस्थांच्यावतीने गटविकास अधिकारी पनवेल पंचायत समिती यांच्याकडे निवेदनाने केली आहे.
वलप गणेशनगर गावासाठी एकमेव असलेला रस्ता खड्यात गेला असून या रत्यातून ग्रामस्थांना ये -जा करावी लागत आहे. त्या रस्त्यावरून चालताना नागरिकांना जखमा होत असून पावसाळी रस्ता पाण्याखाली जात असल्याने ये-जा करणे धोक्याचे होत आहे. तळोजा औद्योगिक विभागसाठी हा रस्ता पैसा व वेळ वाचविणारा असल्याने या रस्त्याचा जास्त वापर होत आहे. त्यात या गावात स्वयंभू गणेशाचे मंदिर असल्याने मंदिरात येणाऱ्या गणेश भक्तांची रस्त्यावर सतत वर्दळ चालू असते. स्वयंभू व भक्ताना पावणारा बाप्पा अशी ख्याती असल्याने या बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबई, ठाणे, पालघर, पेण, उरण, रत्नागिरी व पुणे येथून गणेशभक्त येत असताता येथे महाप्रसादाचे दान करता यावे म्हणून गणेशभक्तानी २०२४ पर्यत आपली नावे बुक करून ठेवली आहेत. असा हा गणेशनगर एमआयडीसी जोडणारा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे.रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे. रस्त्यावर वाहन चालविताना छोटे मोठे अपघात होत आहेत. तर वाहन चालकांना मान, पाठ व कंबर दुखीच्या आजाराने त्रस्त केले आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गावकरी व गणेश भक्तानी वारंवार मागणी करून याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे. तेव्हा या गावातील नागरिकांचा सहानभुतीपूर्वक विचार करून या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी विनंती गणेश नगर ग्रामस्थांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी पनवेल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
Post a Comment