खारघर शहरात शेवाळयुक्त दूषित पाणीपुरवठा : कारणे शोधून योग्य उपाययोजना करा माजी नगरसेविका नेत्रा पाटील यांची मागणी
पनवेल- खारघर शहरात शेवाळयुक्त दूषित पाणीपुरवठा होत आहे, हा दूषित पाणीपुरवठा होत असल्याची कारणे शोधून योग्य उपाययोजना करा अशी मागणी माजी नगरसेविका नेत्रा किरण पाटील यांनी सिडको खारघर पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्याकडे केली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात,खारघर शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून शेवाळयुक्त हिरवेगार पाणी येत आहे,सदरची बाब सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास देखील आणून दिलेली आहे परंतु त्यावर आज तागायत कोणतेही कारवाई करण्यात आलेली नाही. पावसाळा केव्हाही सुरू होऊ शकतो सदर गढूळ,दूषित पाण्यामुळे नागरिकांना विशेषतः घरातील लहान मुलांना विविध आजारांना सामोरे जावे लागेल त्यामुळे आपण तात्काळ पाणीपुरवठा कुठल्या कारणाने दूषित होत आहे हे कारण शोधून योग्यता उपाययोजना कराव्यात अन्यथा खारघरमधील रहिवाशी या गढूळ दूषित पाण्यामुळे आजारी पडतील याची सर्वस्वी जबाबदार सिडको प्रशासनावर राहील असे निवेदनात नेत्रा पाटील यांनी म्हटले आहे.
Post a Comment