आकाशातील ढगाळ वातावरणाने ऊन-सावळ्यांचा खेळ
मांणगाव -(अजित शेडगे) सर्वसाधारणपणे ७ जूनपर्यंत कोकणात येणारा मान्सूनचा पाऊस १०जूनपर्यंत सुरु न झाल्याने वातावरण बदल झाल्याचे दिसून येत आहे .१३ ते १४ तासांचा दिवस, स्वच्छ सूर्यप्रकाश,ऊन सावल्यांचा खेळ, प्रचंड उकाडा आणि सूर्योदय-सूर्यास्त याचे मनोहरी दृश्य गेल्या काही दिवसांपासून कोकणामध्ये अनुभवायला मिळत आहे.
पाऊस लांबल्याचा परिणाम वातावरणात झाल्याचे दिसत आहे.या दिवसात साधारणत: आकाश ढगाळ असते.पावसाचे वातावरण असल्याने आकाश भरून आलेले असते.काहीसे थंड आल्हाददायक वातावरण जून महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यात जाणवते. मात्र यावर्षी पावसाळा लांबल्याने आकाश निरभ्र व स्वच्छ सूर्यप्रकाश पडत आहे.अगदी पहाटे पाच वाजल्यापासून झुंजूमुंजू व्हायला सुरुवात होते . सायंकाळी सात-साडेसातपर्यंत लख्ख सूर्यप्रकाश पडत आहे. पहाटेचा सूर्योदय लवकर होत असल्याने तसेच आकाश निरभ्र असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच ऊन जाणवायला सुरुवात होते. अगदी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत उन्हाची तिरीप जाणवते. त्यामुळे जवळपास १३ ते १४ तासांचा मोठा दिवस अनुभवायला मिळत आहे.
पावसाळ्याच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ सूर्यप्रकाश ढगाळ वातावरण होत असल्याने दुपारी अचानक ऊन सावळ्यांचा खेळही पहावयास मिळत आहे,मध्येच येणारे ढग सावली व उन्हाचा अनुभव देत असल्याने मनोहरी असे दृश्य सूर्योदय, सूर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे.
सूर्योदय सूर्यास्ताच्यावेळी कोवळ्या किरणामुळे आकाशात विविध रंगांची पार्श्वभूमी निर्माण होऊन सुंदर असे दृश्य दिसते. तीव्र उन्हाळा असला तरी सकाळ, संध्याकाळी दिसणारे सूर्योदय सूर्यास्ताचे आभाळात मनोहरी असे दृश्य दिसत असून निसर्ग प्रेमी कलाकारांना वेगळी पर्वणी लाभत आहे.२१ जून हा सर्वात मोठा दिवस असतो. २१जूनच्या पार्श्वभूमीवर अलीकडे पलीकडे काही दिवस मोठ्या दिवसांचा अनुभव येतो. साधारणपणे जून महिन्यात ढगाल हवामान असते यामुळे नेहमीच मोठ्या दिवसांचा अनुभव सहसा येत नाही. यावर्षी मात्र पाऊस लांबल्याने, आकाश निरभ्र असल्याने जास्तीचा सूर्यप्रकाश व मोठा दिवस अनुभवयास मिळत आहे.
२१ जून सर्वात मोठा दिवस असतो. या दिवसाच्या अलीकडील पलिकडील काही दिवस मोठे दिनमान असतं यावर्षी पावसाळा लांबला असल्याने तसेच आकाश निरभ्र राहत असल्याने स्वच्छ व जास्त काळ दिनमानाचा अनुभव येत आहे. ही पूर्णतः नैसर्गिक बाब असून आकाशातील ढगाळ वातावरण यामुळे ऊन, सावळ्यांचा अनुभव तसेच सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळी प्रकाश किरणांमधून विविध रंगांचे भास होताना आपल्याला दिसतात.
भरत काळे,
भूगोल शिक्षक
अलिकडे काही दिवस सकाळ खूप लवकर सुरू होताना दिसते तसेच सायंकाळीही सात साडेसातपर्यंत संधिप्रकाश रेंगाळतो यामुळे मोठा दिवस अनुभवायला मिळत आहे तसेच सूर्योदय सूर्यास्तवेळी विविध रंगांच्या छटा दिसतात हे दृश्य पाहणे फार आल्हाददायी असते.
विजय आरसे,
निसर्गप्रेमी
Post a Comment