कामोठे येथे मोफत हृदयविकार तपासणी आणि अँजिओग्राफी शिबिर
पनवेल - एमजीएम मेडिकल कॉलेज रुग्णालय,कामोठे नवी मुंबई यांच्यावतीने मोफत हृदयविकार तपासणी आणि अँजिओग्राफी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे दि.२९ ते ३० जुलै २०२३ यादरम्यान कामोठ्याच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये आयोजन करण्यात आले आहे.ज्या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह याचा त्रास असेल तसेच वारंवार छातीत दुखणे, नेहमी मळमळ होणे चक्कर येणे,चालताना किंवा जिना चढताना दम लागणे, व्यायाम करताना छातीत दुखणे तसेच नेहमी घाम येणे, कोरडा खोकला, खूप भीती वाटल्यासारखे होणे, अस्वस्थता वाटणे, चेहरा फिका पडणे अशी लक्षणे असलेल्या रुग्णांनी आपले नाव ५ जुलैपर्यंत श्री. एकनाथ बागुल 9321441777, योगेश साखरे 9870851501 यांच्या व्हाट्सअपवर आपल नावे नोंदवावे असे हॉस्पिटलतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment