दृष्टी फाऊंडेशन व सारण्या प्रतिष्ठानच्यावतीने मुली व महिलांसाठी स्वयंसंरक्षण कार्यशाळा
पनवेल- महिलांवरील अत्याचाराच्या वेगवेगळ्या घटनांच्या बातम्या दररोज कानावर पडत असतात. अशी वेळ आपल्या ओळखीच्या कोणावर आली तर, अशा विचाराने सर्वांचे मन सुन्न होते. प्रत्येक स्त्रीने कोणत्याही प्रकारच्या संकटाला तयार असण्याची गरज निर्माण झाली आहे.दरवेळी कोणी मदतीला येईल याची वाट बघण्यापेक्षा तीच स्वतःचे संरक्षण करण्याइतकी परिपूर्ण बनायला हवी.अशाच विचाराने दृष्टी फाऊंडेशन व सारण्या प्रतिष्ठाण संस्थेच्यावतीने दिनांक १ ते ७ जुलै २०२३ या कालावधीत केवळ मुली व महिलांसाठी विनामूल्य स्वयंसंरक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. खांदा कॉलनीतील एस.जी.डी पब्लिक स्कूल,प्लॉट नं.२८,सेक्टर-१०, खांदा कॉलनी, पनवेल येथे प्रशिक्षिण होईल.
या कार्यशाळेत महिलांना कराटे आणि लाठी-काठी तसेच रोजच्या व्यवहारात उपयोगी पडतील अशा स्वसंरक्षणाच्या क्लृप्त्या आणि डावपेच शिकवले जाणार आहेत.हे शिबिर १०-५० वयोगटातील मुली,गृहिणी,व्यावसायिक, तसेच नोकरदार महिला आणि कॉलेज युवतींकरिता उपयुक्त आहे.दि. २८ जून २०२३ पर्यंत दिलेल्या पत्त्यावर येऊन अर्ज भरावे. या कार्यशाळेबाबत अधिक माहितीसाठी या नंबर 9892045745 /8691886339 वर संपर्क करावा. परिसरातील मुली व महिलांनी या कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन दृष्टी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री.किशोर देवधेकर सरांकडून करण्यात आले आहे.
Post a Comment