पनवेलमध्ये योग दिन उत्साहात साजरा : सेल्फी .. फोटोसेक्शन ..आणि योग दिन
पनवेल- जागतिक योग दिन जगामध्ये विविध देशांमध्ये साजरा करण्यात आला. या योग दिनानिमित्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या माध्यमातून योग ही एक जागतिक चळवळ बनली आहे आणि जगातील करोडो लोक योग करत आहेत असा संदेश त्यांनी दिला आहे तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात बदलती जीवनशैली ताण- तणाव यावर मात करण्यासाठी योग आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकानी योग अंगीकारत योग साधनेला लोक चळवळ बनवावी असे आवाहन केले.
पनवेलमध्येही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पनवेलमधील लोकप्रतिनिधी, हॉस्पिटल, न्यायालय,असंख्य महाविद्यालय-विद्यालय, शासकीय कार्यालय, महानगरपालिका, इन्स्टिट्यूट ऑफ योग अँड आयुर्वेद आणि आरोग्य सेवा समिती पनवेल, अंबिका योग कुटीर,योग वर्ग अशाप्रकारे अनेक संस्थांनी योगाची प्रात्यक्षिके व त्या संदर्भात मार्गदर्शन केले.
पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत युवा व ज्येष्ठांनी निसर्गाच्या सानिध्यात माची प्रबळगड येथे योगासने केली. पनवेलमधील प्रसिद्ध लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलच्या एमडी डॉ.जयश्री पाटील यांनी नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांसाठी योग दिनाचे आयोजन केले होते.कोकण विभागीय आयुक्त,पनवेल महानगरपालिका व महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक संघ हॉलमध्ये योग दिन साजरा केला. अधिकारी,कर्मचाऱ्यांना योगासनाचे विविध प्रकार आणि प्राणायमासाठी मार्गदर्शन केले.
अंबिका योग कुटीर पनवेल शाखेतर्फे जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.पनवेल, नवी मुंबईतल्या पाच ठिकाणी हा योग दिन साजरा करण्यात आला. पनवेल तालुक्यातील अजिवली ओएनजीसी वडाले तलाव तळोजा धक्का त्याचप्रमाणे नवी मुंबईतील बेलापूर या ठिकाणी योग वर्ग घेण्यात आले यावेळी योगाचे महत्व विशद करण्यात आले. पनवेल शाखेच्या संचालिका भावना कुलकर्णी यांच्याबरोबर योग शिक्षिका नमिता म्हात्रे, सुजाता माने, मीना कुकटे ,योगशिक्षक मनोज कोलगे,महादेव म्हसकर,राजन फाटक,स्वराली चौबळ यांनी सहभाग घेतला.नवीन पनवेलमध्ये ब्रह्माकुमारी आणि डिवाइन संस्कार रिसर्च फाउंडेशन नील हॉस्पिटलद्वारे आरोग्य आणि आनंदासाठी आंतरराष्ट्रीय योग नील हॉस्पिटलमध्ये संपन्न झाला.लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमतर्फे योग दिन साजरा
लायन्स क्लब ऑफ पनवेलतर्फे गोखले सभागृह, पनवेल येथे योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
अशाप्रकारे पनवेलमध्ये विविध ठिकाणी विविध संस्थांनी योग दिन उत्साहात साजरा केला. योग दिनानिमित्त बऱ्याच जणांनी सेल्फी फोटो काढून आपल्या ताणतणावातून आनंद घेतला.
Post a Comment