News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अवघ्या ३ महिन्यात मालमत्ताधारकांकडून पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत १२६ कोटीची वसुली

अवघ्या ३ महिन्यात मालमत्ताधारकांकडून पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत १२६ कोटीची वसुली

पनवेल : नवीन आर्थिक वर्षामध्ये महापालिकेचा मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांकडून उत्तम प्रतिसाद दिसून येत आहे. मागील एप्रिल महिन्यापासून ते आज दिनांक २२ जूनपर्यंत १२६ कोटी रूपयांची भर महापालिकेच्या तिजोरीमध्ये झाली आहे. आजपर्यंतच्या आर्थिक वर्षामध्ये तीन महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या रकमेची करवसुली होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आयुक्त श्री. गणेश देशमुख यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महापालिकेने मालमत्ता करधारकांकडून थेट वसुलीची कारवाई सातत्याने सुरु ठेवली आहे. या कारवाईसाठी चार प्रभागासाठी आठ पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये खारघरसाठी  2 पथक ,कामोठेसाठी  2 पथक, नावडेसाठी 2 पथक, कळंबोलीमध्ये 2 पथक, पनवेल व नवीन पनवेलसाठी प्रत्येकी 1 पथक तयार करण्यात आली आहेत. या प्रत्येक पथकामध्ये 1 महापालिका कर्मचारी, दोन निवृत्त अधिकारी, 1 सिक्युरीटी गार्ड, 1 कॅमेरामॅन असे सहा सदस्य  आहेत.
मालमत्ता कर भरण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी पालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रात रिक्षातून लाऊड स्पीकरच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. मालमत्ता कर न भरल्यास त्याच्या शास्तीमध्ये प्रतिमहा २ टक्क्यांची वाढ होत असल्याने नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढत आहे. याचबरोबर महापालिकने मालमत्ता कर ऑनलाईन भरण्यासाठी ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित केले आहे. तसेचwww. panvelmc.org या वेबसाईटवरती जाऊनही आपला मालमत्ता कर नागरिकांना भरता येणार आहे.

मा. मुंबई उच्च् न्यायालयाने मालमत्ता कर वसुलीला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी  कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. मालमत्ता कर न भरल्यास नागरिकांच्या मालमत्ता हस्तांतरणावरती बंदी येणार आहे. तसेच मालमत्ता कराचा बोजा मालमत्तेवरती चढविला जाणार आहे.  याचबरोबर स्थावर व जंगम मालमत्ता अटकावून ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी लवकरात लवकरात आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

महापालिकेच्या सर्व प्रस्तावित कामांसाठी मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत आहे. तसेच मा. न्यायालयानेही मालमत्ता कर,वसुलीला स्थगिती दिली नाही.त्यामुळे नागरिकांनी आपला मालमत्ता कर भरुन महापालिकेच्या विकासाचे भागीदार बनण्याचे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment