तळोजात मुस्लिम विद्यार्थ्यांनी आषाढी वारीत सहभाग घेत टाळ,अभंगाच्या ठेक्यावर ताल धरला : हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन
पनवेल - बहुसंख्य मुस्लिम विद्यार्थी असलेल्या पनवेल तालुक्यातील तळोजा पाचनंद येथील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले.शाळेतर्फे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली,यामध्ये या मुस्लिम विद्यार्थ्यांनी भक्तीभावे सहभाग घेतला.
शाळेमध्ये मोठ्या उत्साहाने आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. या आषाढी एकादशीच्या उत्सवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा पाटील तसेच शिक्षक जी.आर म्हात्रे, सचिता गिजे,प्रविण रेवाळे,रामप्रसाद केकान,कुमार शिर्के,विभावरी सिंगासने,
श्रीमती योगिनी यल्लाप्पा वैदू शिक्षक उपस्थित होते
२७० शाळेचा पट असून मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग घेत टाळ आणि अभंगाच्या ठेक्यावर ताल धरला.शाळा व्यवस्थापन समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष गायकवाड उपस्थित होते तसेच शाळेचे माजी अध्यक्ष कांबळे यांनीही शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख बा.ना.म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबविले जातात.
यावेळी विद्यार्थ्यांना बुंदी खाऊचे वाटप करण्यात आले आणि शाळेला लायन्स क्लब ऑफ न्यू मुंबई स्टिल टाऊनकडून ग्रंथालयाकरिता कपाट भेट देण्यात आले.
Post a Comment