अवघी दुमदुमली पंढरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा
पंढरपूर - आषाढी एकादशीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा संपन्न झाली.
यावर्षी मानाचे वारकरी म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वाकडी गावातील भाउसाहेब मोहनीराज काळे आणि मंगल भाऊसाहेब काळे या शेतकरी दाम्पत्याला पुजेचा मान मिळाला.हे माऊली गेल्या २५ वर्षांपासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर अशी पायी वारी करतात,त्यांना देखील मुखमंत्री यांनी नमन करून त्यांना सुख शांती समाधान प्राप्त व्हावे अशी मनोकामना व्यक्त केली.
राज्यात नुकतीच पावसाला सुरुवात झाली असून यंदाचे पर्जन्यमान समाधानकारक ठरावे आणि राज्यातील बळीराजा सुखी- समाधानी व्हावा हे आणि एवढेच मागणे मी विठुरायाच्या चरणी मागितले.जनसेवेचा जो वसा माझ्या हाती पांडुरंगाने सोपवला आहे तो असाच पुढे नेण्याचे बळ मिळावे एवढीच इच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे वडील संभाजी शिंदे,पत्नी सौ.लता शिंदे,मुलगा खासदार डॉ.श्रीकांत शिंदे,सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे आणि नातू रुद्रांश तसेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री,आमदार उपस्थित होते.
Post a Comment