News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

नवीन पनवेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करा : ठाकरे गटाच्या शिवसेनेची खांदेश्वर पोलिसांकडे मागणी

नवीन पनवेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करा : ठाकरे गटाच्या शिवसेनेची खांदेश्वर पोलिसांकडे मागणी

पनवेल : हुक्का पार्लरची संस्कृती मोठ्या प्रमाणात फोफावत आहे तसेच तरुणाई व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे,त्यामुळे नवीन पनवेलमध्ये सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे) च्यावतीने खांदेश्वर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन करण्यात आली आहे.

नवीन पनवेल रस्ता क्रमांक एक एचडीएफसी सर्कलच्या पाठीमागे इडस्ट्रीय प्लॉटमध्ये अनधिकृत हुक्का पार्लर चालू असून आहे. या ठिकाणी अल्पवयीन मुले सुद्धा रात्री बे रात्री ह्या रस्त्यावर नशेमध्ये असतात. दरम्यान तरुण पिढी वाया जाऊ नये या करीत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली  गलांडे यांची भेट घेऊन या संदर्भात माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पनवेल परिसर हे एक ऐतिहासिक शहर असून या शहराची नशेचे शहर अशी ओळख होऊ नये,वेळीच पालकांनी वेळीच सावध होऊन आपल्या पाल्याकडे लक्ष द्यावे, तरुणपिढी वाया जाऊ नये असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यानी केले आहे. 

यावेळी शिवसेना शिवसेना(उद्धव बाळासाहे ठाकरे) तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शहरप्रमुख पनवेल प्रविण जाधव, युवासेना विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपमहानगरप्रमुख रामदास गोंधळी, कार्यालयप्रमुख संदीप तोरणे,शहर समन्व्यक गणेश परब,शाखापमुख तानाजी यादव, विभागप्रमुख शुभम माळी, उपशहर प्रमुख सन्नी टेमघरे, युवासैनिक नितिन प्रविण उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment