भरगच्च कार्यक्रम-उपक्रमांनी माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस होणार साजरा : शेतकरी कामगार पक्ष पनवेलतर्फे आयोजन
पनवेल - शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस आरोग्य, शैक्षणिक,सामाजिक अशा विविध कार्यक्रम-उपक्रमांनी पनवेल,उरण तालुक्यात साजरा केला जाणार आहे. संकट काळातही कार्यकर्त्यांमध्ये वाढदिवस साजरा करण्यासाठी तोच जल्लोष ..तोच उत्साह दिसत आहे. सोशल मीडियावरही वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे बॅनर झळकत आहेत.
१९ जून या दिवशी माजी आमदार विवेक पाटील यांचा वाढदिवस. वाढदिवस आणि माजी आमदार विवेक पाटील यांचा एक नातं आहे. गेली अनेक वर्षे माजी आमदार विवेक पाटील हे आपला वाढदिवस पनवेल-उरण तालुक्यात वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करत आले आहेत.
शेतकरी कामगार पक्ष पनवेलच्यावतीने वाढदिवसाच्या निमित्ताने १८ जून २०२३ रोजी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ,त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष पनवेल कार्यालयामध्ये भव्य रक्तदान शिबिर, व्ही.के. हायस्कूल येथे मोफत नेत्र तपासणी व चष्मे वाटप विरूपाक्ष मंगल कार्यालय पनवेल येथे दहावी व बारावीच्या गुणवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, ग्रुप ग्रामपंचायत चिपळे येथे घंटागाडी लोकार्पण व विविध विकास कामांचे उद्घाटन त्याचप्रमाणे व्ही. के.हायस्कूल पनवेल येथे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती नवनिर्वाचित संचालक तसेच पनवेल अर्बन बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार व भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे.
१९ जून २०२३ रोजी भव्य वृक्षारोपण,५ आदिवासी वाड्यावर वह्यावाटप, नवीन पनवेल येथे आरोग्य शिबिर व पॅन कार्ड शिबिर,वावंजे इथे आरोग्य शिबीर व निराधार महिलांना मदत, चिंचवण येथे जिल्हा परिषद शाळा उद्घाटन देवळोली येथे स्मशानभूमी उद्घाटन,कामोठे येथे गुणगौरव सोहळा, रोहिंजण येथे गुणगौरव सोहळा,खांदा कॉलनी येथे शालेय वह्यावाटप, कळंबोली येथे पदाधिकारी पदनियुक्ती,आदई येथे छत्री वाटप, चिखले येथे वाटप छत्री वाटप व वाचनालय उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Post a Comment