हिंदू लोेहार समाजातर्फे पनवेलमध्ये गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा....
पनवेल - हिंदू लोहार समाज पनवेल तालुका सामाजिक विकास मंडळातर्फे रविवार दि.१८ जून २०२३ रोजी दुपारी ३ वाजता तथास्तू हॉल पनवेल येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित केला आहे.
याप्रसंगी मंडळाची सर्वसाधारण सभाही होणार आहे.सदरची सभा जेष्ठ समाजबांधव महादेव हरीभाऊ सोमासे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या समारंभात उद्योजक गणेश पांडुरंग राऊत यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या समारंभास पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रेे, जेष्ठ उद्योजक गणेश राऊत, हिंदू लोहार समाज महासंघाचे अध्यक्ष जनार्दन जोशी,पनवेल अर्बन बँकेचे संचालक पांडुरंग भागिवत, सी.ए. मुकुंद वैशंपायन,अतुल शेट्ये तसेच निवृत्ती राऊत,निवृत्त अभियंता राजेश सोमवंशी तसेच यशवंत मन्वाचार्य, सामाजिक कार्यकर्ते गणपत कदम तसेच पत्रकार दिनेश पवार,शशिकांत दळवी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावेे असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र पायरेे, उपाध्यक्ष संतोष जाधव, भालचंद्र कदम, सचिव वसंत मोरे यांनी केले आहे.
Post a Comment