फ्री स्टाईल हाणामारीतून काँग्रेसमधील घराणेशाही आणि गटबाजीचे दर्शन - भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील
पनवेल - युवक काँग्रेसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत दोन गटाच्या कार्यकर्त्यांच्या फ्री स्टाईल हाणामारीतून काँग्रेसमधील घराणेशाही आणि गटबाजीचे दर्शन झाले,यातून काँग्रेस घराणेशाहीचे समर्थन करते का? असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना केला आहे.
यावेळी बोलताना विक्रांत पाटील यांनी,आज युवा काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीला केंद्रीय नेते,युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष,सचिव आणि प्रभारी उपस्थित होते.असे असताना त्यांच्यासमोर दोन गटातील हाणामारी-मारामारी सर्वांना पाहायला मिळाली. प्रस्थापितांची मुले सातत्याने त्यांनाच मिळणारी संधी अशा प्रकारे काँग्रेसची मानसिकता आहे याविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांनी आवाज उठवला, विरोध केला म्हणून हाणामारी करण्यात आली. नेत्यांची मुले नेतेच होणार. ही काँग्रेसची घराणेशाही असून यातून घराणेशाहीचे समर्थन काँग्रेस करते का? असा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केला आहे.
पक्षात केवळ घराणेशाही सुरू असून प्रस्थापित नेत्यांच्याच मुलांना संधी दिली जाते असा आरोप युवक काँग्रेसचेच पदाधिकारी करत आहेत.आज याच विषयाला घेऊन काँग्रेस राष्ट्रीय प्रभारी व नेत्यांसमोर कार्यकर्त्यांच्या हाणामाऱ्या झाल्या.काँग्रेसच्या घराणेशाही आणि अशा हाणामारी संस्कृतीतून काँग्रेस नक्की युवांना काय संदेश देऊ इच्छिते? याचे उत्तर राहुल गांधी यांनी दिले पाहिजे असे विक्रांत पाटील यांनी सांगितले.
Post a Comment