News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुळ पनवेल नगरपालिका क्षेत्रातील मिळकतींना चुकीच्या कर नोटीसा : योग्य ते बदल करुन नोटीसा सुधारणा करुन नव्याने पाठवा अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी

मुळ पनवेल नगरपालिका क्षेत्रातील मिळकतींना चुकीच्या कर नोटीसा : योग्य ते बदल करुन नोटीसा सुधारणा करुन नव्याने पाठवा अ‍ॅड. मनोज भुजबळ यांची मागणी

पनवेल (संजय कदम): मुळ पनवेल नगरपालिका क्षेत्रातील मिळकतींना चुकीच्या प्रकारे वाटप केलेली कराची नोटीस- कर देयके संदर्भात माजी नगरसेवक अ‍ॅड.मनोज भुजबळ यांनी पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त गणेश शेट्ये यांना निवेदन दिले आहे. 
 
या निवेदनात त्यांनी नमुद केले आहे की, आपल्या कार्यालयाकडून सध्या महापालिका क्षेत्रातील प्रभाग ड मधील पोदी नं. - १, २, ३, भुजबळवाडी, भुजबळ मळा येथील मिळकतींबाबत जी कर देयके / कराची नोटीस चुकीच्या पध्दतीने दिलेल्या आहेत. उदा. (१) नविन करदेयकात जुना घर नं. (घरपट्टी नं.) नोंदविलेला नाही. त्यामुळे नविन नंबरप्रमाणे दिलेली नोटीस / देयके नक्की कोणत्या घराचे, चाळीचे, फ्लॅटचे आहे हे समजणे कठिण झाले आहे. एकापेक्षा जास्त मिळकती असणाऱ्या व्यक्तींना नक्की कोणते बिल कोणत्या मिळकतींसाठी आपण पाठविले आहे हेच कळून येत नाही. (२) यापुर्वी नगरपालिका क्षेत्रातील घरांच्या घरपट्टी महापालिका झालेल्या वर्षापासून म्हणजेच सन २०१६ पासून २०२३ पर्यंत नियमित भरलेली असूनही पुन्हा कोणतीही शहानिशा न करता मागील ५ वर्षापासून घरपट्टी पुन्हा आकारणी करुन कराची नोटीस/देयके पाठवून दिलेल्या आहेत. (३) घरमालकांच्या नावाऐवजी “मालक” ऐवजी "धारक” अशी नोंद केलेली दिसून येते. 

अशाप्रकारे चुकीची कराची नोटीस पाठवून आपल्या कार्यालयाने एकूणच सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये संभ्रम गोंधळ निर्माण केलेला आहे. तरी पुन्हा एकदा वरील सर्व मुदयांचा विचार करुन कराच्या नोटीसींमध्ये योग्य ते बदल करुन कराची पाठविलेली नोटीस पुन्हा सुधारणा करुन नव्याने पाठवून सहकार्य करावे अन्यथा सर्वसामान्य नागरिकांमध्ये महापालिकेच्या अशा कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. असे निवेदनात म्हंटले आहे. या निवेदनाची प्रत आमदार प्रशांत ठाकूर यांनाही देण्यात आली आहे.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment