रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाचे काम : तक्कामार्गे विचुंबे,नवीन पनवेलकडे तर नवीन पनवेल-विचुंबेमार्गे पनवेल,तक्काकडे येण्या-जाण्यासाठीचा भुयारी मार्ग बंद
पनवेल- रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाचे काम सुरू झाल्याने तक्कामार्गे विचुंबे,नवीन पनवेलकडे तर नवीन पनवेल-विचुंबेमार्गे पनवेल,तक्काकडे येण्या-जाण्यासाठीचा भुयारी मार्ग बंद करण्यात आला आहे, वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंदी घोषित करण्यात आली आहे.
सदरचे दुपदरीकरणाचे काम अंदाजे ३ महिने चालू राहणार आहे. विचुंबे,पोदी, नवीन पनवेलच्या काही भागातील नागरिकांनी नवीन पनवेलमधील फायर ब्रिगेड,एचडीएफसी सर्कल या मार्गाचा वापर करावा असे सांगून नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन पनवेल शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.
Post a Comment