News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरेपर्यंत्तच्या रस्त्याच्या कॉक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन : आ.प्रशांत ठाकूर यांचा स्थानिक ग्रामविकास निधी

पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरेपर्यंत्तच्या रस्त्याच्या कॉक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन : आ.प्रशांत ठाकूर यांचा स्थानिक ग्रामविकास निधी

पनवेल- विकासाच्या कामांसाठी पुढाकार महत्वाचा असतो, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रस्त्याच्या कामांच्या शुभारंभावेळी केले. पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या २ कोटी ८० लाख रुपयांच्या स्थानिक ग्रामविकास निधीमधून पनवेल तालुक्यातील वाकडी ते दुंदरे पर्यंत्तच्या रस्त्यांचे कॉक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यात येणार आहे. याकामांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अनेक विकास कामांना गती प्राप्त झाली आहे. त्यांच्या सातत्यपुर्ण पाठपुरवाव्यामुळे वाकडी ते दुंदरे पर्यत्तच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या २ कोटी ८० लाख रुपयांचा स्थानिक ग्रामविकास निधीमधून रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. त्यामध्ये चिंचवली ते दुंदरेपाडा पर्यंतच्या रस्त्याचे २ कोटी ३० लाख रुपयांच्या निधीमधून डांबरीकरणाचे आणि दुंदरे गाव ते तामसई फाटापर्यंतच्या रस्त्याचे ५० लाख रुपयांच्या निधीमधून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या कामांचे भुमीपूजन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि भाजपचे पनवेल तालुक अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. 

या विकासकामांच्या शुभारंभावेळी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, विधानसभा निवडणूकप्रमुख तथा भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस भुपेंद्र पाटील, माजी उपसरपंच रमेश पाटील, नेरे जिल्हा परिषद अध्यक्ष सुनिल पाटील, नितीन पाटील, दुंदरेच्या सरपंच अनुराधा वाघमारे, उपसरपंच किशोर पाटील, माजी सरपंच नामदेव जमदाडे, अमोघ प्रशांत ठाकूर, शांताराम चौधरी, गुरुनाथ भोपी, वासुदेव भोपी, कृष्णा पाटील, विष्णू भगत, नवनाथ भोपी, नितीन काठवले, पोलीस पाटील दीपक पाटील, नारायण मढवी, नरेश वास्कर, नरेश चौधरी, गणेश उसाटकर, हरीशेठ पाटील, रामदास शेळके, दयेश जांभळे, सुनील शेळके, रुपेश पाटील, भागेश शेळके, सीताराम पाटील, बाळाराम गोंधळी, जाना शेळके, प्रकाश शेळके, विठ्ठल शेळके, नारायण शेळके, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment