News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस : सतर्क पनवेल शहर पोलिसांचा रूटमार्च

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस : सतर्क पनवेल शहर पोलिसांचा रूटमार्च

पनवेल (संजय कदम) : सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस यामुळे पनवेल परिसरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलीस सतर्क झाले आहेत. शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पनवेल शहर पोलिसांनी आज सकाळी पनवेल शहरातील विविध भागातुन रुट मार्च काढला.


सध्या महाराष्ट्रात सोशल मीडियावर महपुरूषांच्या आक्षेपार्ह पोस्ट व स्टेटस समाजकंटकांकडून वायरल होत असल्याने वारंवार राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण होत आहे. या घटनांची झळ पनवेल शहरात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी पनवेल शहरातून रूटमार्च काढला. या रूटमार्चला पनवेल शहर पोलीस ठाणे येथून सुरुवात झाली. त्यांनतर पनवेल शहरातील आदिल टॉवर, मुसलमान नाका, मोहल्ला परिसर, टपालनाका, पंचरत्न चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ या रूटमार्चचा समारोप झाला. या रूटमार्चमध्ये पायी पथक, मोटारसायकली व इत्तर पोलीस अधिकारी आपल्या वाहनांसोबत सहभागी झाले होते.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment