ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रयोगशाळा : रोटरी क्लब ऑफ पनवेलचा अनोखा उपक्रम
पनवेल (संजय कदम) : रोटरी क्लब ऑफ पनवेलने तालुक्यातील भाताण येथे असलेल्या भाताण माध्यमिक विद्यालय यांना नवीन विज्ञान प्रयोगशाळा बांधून दिली. या प्रयोगशाळेचे उदघाटन रोटरीचे प्रांतपाल डॉ.अनिल पालमार यांच्या हस्ते झाले.
सदर कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष रो.शिरीष नांदेडकर, सचिव श्रीकृष्ण पाटील, सेवा डायरेक्टर राजन म्हात्रे व इतर रोटरी सदस्य उपस्थित होते.८ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचा लाभ दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना घेता येईल. यावेळी मुख्याध्यापक श्री मोकल यांनी पाहुण्यांना शाळेची माहिती देऊन प्रयोगशाळेच्या बांधणीबद्दल रोटरीचे आभार व्यक्त केले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रो.श्याम जहांगीरदार व रो.प्रसाद दीक्षित यांनी केली.
Post a Comment