पनवेलमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरार-अलिबाग कॉरिडोर व नैना प्रकल्पांचा पाहणी दौरा : शेतकऱ्यांशी संवाद साधणार
पनवेल - विरार-अलिबाग कॉरिडोर व नैना प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पनवेलमध्ये येेणार आहेत. सोमवार २९ मे २०२३ रोजी दुपारी २ वाजता पनवेलच्या प्रांत ऑफिसमध्ये बैठक आणि शेतकर्यांशी संवाद साधणार आहेत, त्याचबरोबर या प्रकल्पांची ते पाहणी करणार आहेत.
याप्रसंगी पनवेल विधानसभा मतदारसंघातील अलिबाग कॉरिडोर व नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी व महाविकास आघाडी पदाधिकारी, ठाकरे गटाच्या शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, युवासेना पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, शिक्षकसेना पदाधिकारी, भारतीय विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, कामगार सेनेचे पदाधिकारी, ग्राहक कक्ष, माजी जि.प.सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, माजी नगसेवक, सरपंच, ग्रा.पं.सदस्य शिवसेना संलग्न संघटना तसेच शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचेे आवाहन ठाकरे गटाचेे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.
Post a Comment