तळोजात दीड हजार कोटींच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट : सुमारे ३५० किलोचे अंमली पदार्थ
पनवेल- पनवेलजवळील तळोजा औद्योगिक क्षेत्रात मुंबई कस्टम झोन ३ च्यावतीने जप्त केलेल्या दीड हजार कोटींच्या अंमली पदार्थांची आज विल्हेवाट लावण्यात आली.तळोजा औद्योगिक क्षेत्रातील मुंबई वेस्ट मॅनेजमेंटमध्ये ही विल्हेवाट लावण्यात आली.
यामध्ये कोकेन,हेरॉईन, गांजा, एमडीएम ,मेथॅम्फेटामाइन या 350 किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली. तळोजा येथे उच्चस्तरीय औषधी विल्हेवाट समितीच्या देखरेखेखाली शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली.
Post a Comment