पनवेलमध्ये दोन दिवसीय खो-खो प्रीमियर लीग : ६ संघ आणि ६६ खेळाडूंचा सहभाग
पनवेल - जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड, जिल्हा क्रीडा परिषद, अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र (खो खो), रायगड आणि आशिर्वाद स्पोर्ट्स क्लब कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हाधिकारी रायगड तथा अध्यक्ष जिल्हा क्रीडा परिषद डॉ.योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका क्रीडा संकुल, पनवेल येथे खो खो प्रीमियर लीग स्पर्धा शनिवार, दि.27 मे व रविवार, दि.28 मे 2023 रोजी संपन्न होतील.या खो खो लीग मध्ये 6 संघ आणि 66 खेळाडू सहभागी होतील. ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्याकरिता खोखो क्रीडा मार्गदर्शक मनीषा मानकर, शुभम कांबळे प्रयत्न करीत आहेत.
Post a Comment