पनवेल महानगरपालिकेतर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
पनवेल : पनवेल महापालिका व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्यामाध्यमातून लोकसहभागातून ढोल-ताशाच्या गजरात लेझीम, चित्ररथासहीत भव्य मिरवणूक पनवेल शहरातून काढण्यात आली. त्याचबरोबर आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेने निबंध व वक्तृत्व स्पर्धा अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला.
सकाळी साडे सात वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आमदार प्रशांत ठाकूर, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेटे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉ.वैभव विधाते, तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर,माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अनिल भगत, नितीन पाटील, भाजप शहराध्यक्ष जयंत पगडे, माजी नगरसेविका दर्शना भोईर,डाॅ. सुरेखा मोहकर यांनी अभिवादन केले.
यानंतर लेझीम, ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.तसेच या मिरवणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनविण्यात आले होते. याबरेाबरच रमाबाई महिला मंडळ, शिवाजीनगर यांनी सामुहिक गायन केले. या मिरवणूकीची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आली.मिरवणुकीच्या समारोपाचा कार्यक्रम भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये घेण्यात आला.
याठिकाणी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी महापालिकेच्यावतीने मिरवणूकीत सहभागी झालेल्या विविध संघटना ,महिला मंडळे, पोलिस विभाग, ट्राफिक पोलिस, वर्गणीदार सर्वांचे आभार मानले. तसेच मिरवणुकीतील स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल-ताशा मंडळे,लेझीम पथके, चित्ररथ आणि वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे क्रमांक जाहीर आले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आपल्या मनोगतामध्ये म्हणाले," डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य, दलित ,बहुजन समाजासाठीचे त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे.ज्या समर्पित वृत्तीने त्यांनी काम केले ते न भूतो न भविष्यती असे आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे.
माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना बुध्द पौर्णिमेला होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये बक्षिस वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी महापालिका अधिकारी व कर्मचारी, शिक्षक,विविध संस्थांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चित्ररथ स्पर्धा
प्रथम क्रमांक - महापालिका शिक्षण विभाग
व्दितीय क्रमांक - बौध्दजन पंचायत समिती शाखा १
लेझीम पथक
प्रथम क्रमांक - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महापालिका शाळा क्र. ८ पोदी
द्वितीय क्रमांक -महापालिका लोकनेते दि.बा पाटील शाळा क्र.१
Post a Comment