चला महात्मा गांधी समजून घेऊ या ... पनवेलच्या शांतीवनात युवा कार्यकर्त्यांची निवासी कार्यशाळा
व ग्राम स्वराज्य समिती महाराष्ट्र यांच्यावतीने चला महात्मा गांधी समजून घेऊ या! या युवा कार्यकर्त्यांच्या निवासी कार्यशाळेचे आयोजन पनवेल जवळील कुष्ठरोग निवारण समितीच्या शांतिवनामध्ये दि.१६ ते २२ एप्रिल २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे.या कार्यशाळेस महात्मा गांधीजींचे पणतू तुषार गांधी भेट देऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेत युवा कार्यकर्त्यांसाठी पहिल्या दिवशी कार्यशाळेचे उद्घाटन,ग्रामस्वराज्य ... महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत, धर्मनिरपेक्षता,गांधी आणि युवा, प्रवचनातून गांधी, गांधीजींचे हिंदस्वराज्य,वैज्ञानिक दृष्टिकोन, गांधीजींचे मुस्लिम सहकारी व त्यांची आंदोलने,गांधी विचार आणि आजची आव्हाने आदी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी नाट्यकलाही सादर केल्या जाणार आहेत. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्रातील विचारवंत मार्गदर्शन करणार आहेत.
Post a Comment