डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खांदा कॉलनी येथे ३ दिवसीय समता आर्ट फेस्टिवल
पनवेल:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती वैचारिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे साजरी व्हावी या उद्देशाने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने, खांदा कॉलनी. पनवेल येथे समता आर्ट फेस्टिवल आयोजन करण्यात येणार आहे.
यामध्ये सुप्रसिद्ध चित्रकार छायाचित्रकार व कलाकार भाग घेणार आहेत या तीन दिवसीय समता आर्ट फेस्टिवलमध्ये महामानवांच्या विचाराचा जागर होईल.
१४ एप्रिल २०२३ रोजी आनंद पवार (कार्यकारी संचालक, सम्यक संस्था पुणे) यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत राष्ट्रवाद याविषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे तसेच दिनांक १४ ते १६ एप्रिल २०२३ दरम्यान महामानवांच्या विचारांचे भव्य प्रदर्शनी, विविध स्पर्धा, आरोग्य तपासणी शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील.
समता आर्ट फेस्टिवलमध्ये खालील कलावंताची कलाकृती असणार आहे.
१) पद्मश्री छायाचित्रकार सुधारक ओल्वे
२) प्रा.डॉ सुनील अभिमान अवचार ( चित्रकार, कवी ,प्राध्यापक मुंबई विदयापीठ आणि सुप्रसिद्ध चित्रकार
उत्तम घोष,विक्रांत भिसे , संजीव सोनपिंपळे ,मानव देठे, सृजना श्रीधर ,गोपाल गंगावणे, श्रुती क्षीरसागर
सहभागी होतील
१) संविधान चौक module (सिद्धाराम गायकवाड)
२) People celebrating constitution module.. कोरो इंडिया ( नागेश जाधव )
३) अंधश्रद्धा निर्मूलन कला प्रदर्शन महाराष्ट्र अंनिस शाखा पनवेल.
अशा विविध कलाकृतींचा समावेश केला जाईल.हा कार्यक्रम खांदेश्वर पोलीस स्टेशन समोरील मैदानात, सेक्टर ८, खांदा कॉलनी, पनवेल येथे होईल
जयंती हा समतेच्या उत्सव तुमच्या आमच्या जगण्याचा उत्सव आहे,आपल्या जगण्याचा संविधान आणि महामानवाचे विचार यावेत यासाठी या कार्यक्रमात भारतीय नागरिक म्हणून सहभागी होण्याचे आवाहन संविधान प्रचारक प्रविण जठार यांनी केले आहे.
Post a Comment