पनवेलचे मंजूर पासपोर्ट ऑफिस सुरू करा - खा.श्रीरंग बारणे यांची परराष्ट्र मंत्र्यांकडे मागणी
पनवेल - पनवेलचे मंजूर पासपोर्ट ऑफिस सुरू करा अशी मागणी खा.श्रीरंग बारणे यांनी परराष्ट्र मंत्री यांच्याकडे केली आहे.
पनवेल येथील नवीन पासपोर्ट सेवा केंद्राला मंजूरी मिळूनही पासपोर्ट कार्यालय चालू केले नाही.
याबाबत परराष्ट्र मंत्री श्री एस. जयशंकर यांची भेट घेऊन पनवेल येथील मंजूरी दिलेले पासपोर्ट सेवा केंद्र चालू करण्याची मागणी केली.
पनवेलकरांना पासपोर्टसाठी आत्ता ठाणे आणि वाशी येथील पासपोर्ट कार्यालयात जावे लागते. पनवेलला पासपोर्ट स्वतंत्र ऑफिस झालं तर पनवेलकरांचा वेळ वाचेल.
Post a Comment