“ माझे घर आणि स्वयंपाकघर " : पनवेलकरांसाठी एक आगळा-वेगळा कार्यक्रम
पनवेल : मने आणि माणसे जोडण्याचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात आणि पोटात जाणाऱ्या अन्नाचा प्रवास शेतातून सुरू होतो…..तो कसा ? तर ते उलगडून दाखवण्यासाठीच आयोजित केलेला कार्यक्रम…. म्हणजे“ माझे घर आणि स्वयंपाकघर " या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे.
श्रीम. अनुराधा भडसावळे आपल्याशी “सगुणा बाग“ या संकल्पनेविषयी संवाद साधतील तर श्रीम. छाया वारंगे दररोज स्वयंपाकगृहात वापरल्या जाणाऱ्या विविध घटक पदार्थांच्या खरेदीतील रहस्ये उलघडून त्यांची खरेदी चोखंदळ कशी करावी हे सांगत संवाद साधतील.
कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.गृहीणी, कॅटरर्स, खवय्ये, डॅाक्टर, वाण सामान विक्रेते, तयार खाद्यपदार्थाचे व्यापारी अशा अनेकांसाठी हा कार्यक्रम म्हणजे बौद्धीक मेजवानी आहेच शिवाय या मेजवानी नंतर प्रत्येकाला उपयुक्त भेटवस्तूही आहे. या भेटवस्तूचे लाभार्थी आपण व आपली मित्रमंडळी, परिचित व नातेवाईकही असावेत असे आम्हाला मनापासून वाटते.
कार्यक्रमाची नावनोंदणी सोबत दिलेल्या गुगल फॅार्मद्वारे करणे आवश्यक आहे. कृपया लवकरात लवकर नांव नोंदणी करावी ही विनंती! 🙏
https://tinyurl.com/2p8znwp9
खास आर्कषण : “सगुणा बाग“ कृषी उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री.कृषी पर्यटनातही खरेदीची नांदी! चुकवू नका ही अनोखी संधी! जास्तीत जास्त मंडळींपर्यंत हा संदेश पोहोचवून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचा दिवस व वेळ
रविवार दि. ३०.०४.२०२३
सायं. ४.०० ते ६.००
स्थळ : गोखले सभागृह, तळ मजला, स्वामी नित्यानंद मार्ग, पनवेल महानगर पालिकेजवळ, पनवेल.
कार्यक्रम ठिक ४ वाजता सुरू होईल .
अधिक माहीतीसाठी संपर्क :
डॅा. पराग सदानंद काळण 98201 42333 सौ.अस्मिता पराग काळण 98332 22110
सौ. मुग्धा मंदार काळे 90211 61185
श्री. गणेश चंद्रकांत कडू 99672 50007
कु. मंजिरी श्रीकृष्ण काळे 98696 52733
Post a Comment