डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक,सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन
पनवेल- . डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक,सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन पनवेलच्या तक्का येथील मोराज रिव्हर साईड पार्क येथे करण्यात आले आहे.
१३ ते १४ एप्रिल २०२३ या दोन दिवसीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिलांसाठी स्पर्धात्मक कार्यक्रम म्हणजे... खेळ पैठणीचा, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम... रेकॉर्ड डान्स स्पर्धा,ध्वजारोहण व महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन,लहान मुलांच्या चित्रकला व निबंध स्पर्धा,लहान मुले व महिलांसाठी विविध स्पर्धात्मक स्पर्धा,भीम पर्व ऑर्केस्ट्रा, पारितोषिक वितरण समारंभ आदी कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी सुचित्रा बोराडे - 8652211670 ,वैशाली गायकवाड - 9619550692, सुनिता खिल्लारे - 9321950783 ,शुभांगी कांबळे- 8600124599 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Post a Comment