News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

अखेर 'तेथे' साफसफाई झालीच ...पनवेलच्या मोहल्ल्यातील जागृत नागरिकांचा पुढाकार

अखेर 'तेथे' साफसफाई झालीच ...पनवेलच्या मोहल्ल्यातील जागृत नागरिकांचा पुढाकार

पनवेल -  पनवेलच्या मोहल्ल्यातील नाक्यावर पडलेल्या कचऱ्याची अखेर मोहल्ल्यातीलच जागृत नागरिक यांनी पुढाकार घेऊन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या सहकार्याने कायमस्वरूपी साफसफाई केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या स्वच्छतेसाठी सामाजिक कार्यकर्ते आतीफ मस्ते, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, सामाजिक कार्यकर्ते शोएब कच्छी, अनिल कथारे, जुबेर पित्तू, युसुफ मुल्ला, ओसामा पटेल तसेच महानगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक शैलेश गायकवाड यांनी पुढाकार घेऊन स्वच्छ मोहल्ला ही संकल्पना पूर्णत्वास नेण्याचा मनोमन प्रयत्न केला आहे.

पनवेल शहरातील मोहल्ल्यातील ईरॉस टेलर व डॉ. ईंडीच्या दवाखान्या समोरील नाल्यालगत सतत घाणीचे साम्राज्य असायचे या ठिकाणी नेहमीच कचरा टाकला जात असत, साचलेला कचरा आजूबाजूला पसरून तो रस्त्यावर येत असे त्यामुळे हा परिसर दुर्गंधीत व्हायचा. कुत्रे, उंदीर, माशा, मच्छर यांचा वावर असायचा. रोगराईचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता असायची. पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत वेळोवेळी येत असत. तेथे स्वच्छताही व्हायची पण ते गेल्यानंतर परिस्थिती जशीच्या तशी असायची.
पनवेलमध्ये असा साचलेला कचरा कुठे दिसत नव्हता. या ठिकाणी साचलेल्या कचऱ्याकडे पाहून लोकं वेगळ्या नजरेतून पहायचे, त्यामुळे माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्यासारख्या जागृत नागरिकांना त्याची चिड येत असत. या भागात देश- विदेशातून आलेल्या पाहुण्यांना हे चित्र पाहून वाईटही वाटायचे.. यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा म्हणून माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या मित्र परिवारांनी महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यावर प्रत्यक्ष कृती करण्यासंदर्भात निवेदन दिले.

एके दिवशी या ठिकाणी आरोग्य विभागाच्या मदतीने सर्व कचरा उचलला गेला. तेथे छान पध्दतीने साफसफाई करण्यात आली. झाडांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या मित्र परिवारांनी येथील भिंतींवर स्वच्छतेविषयी संदेश देत रंगविण्यात आल्या. नागरिकांना बसण्यासाठी लाकडी बाकडे ठेवण्यात आले. आज या ठिकाणचे पूर्णपणे वातावरण बदलले आहे. या ठिकाणी रंगवलेल्या भिंतीवर वेगवेगळे स्वच्छतेचे संदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये वाट पाहीन पण माझा कचरा घंटागाडीत देईन, आपल्या लाडक्या शहरांचे व इतर परिसर जसे कचरामुक्त, स्वच्छ व अल्लाददायक आहेत तसेच आपले मोहल्ले स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प करू या. या स्वच्छतेच्या घेतलेल्या माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला यांच्या मित्र परिवाराच्या भूमिकेचे सर्वांनी स्वागत केले आहे.


कचरा मुक्त मोहल्ला अभियान 
राबविणार - सईद मुल्ला
           या स्वच्छतेविषयी बोलताना माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला म्हणाले, स्वच्छतेविषयी बदल घडून आला आहे. आता यात सातत्य राहिले पाहिजे. स्वच्छतेच्या बाबतीत रंगवलेल्या भिंतीवर आम्ही स्वच्छतेचे संदेश दिले आहेत. त्यातून नागरिकांचे प्रबोधन व्हावे ही आमची भूमिका आहे त्याचप्रमाणेय स्वच्छतेविषयी जाणीव निर्माण व्हावी म्हणून आम्ही कचरा मुक्त मोहल्ला अभियान राबविणार असल्याचे सांगितले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment