पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक
पनवेल : पनवेल जवळील कामोठे येथे राहणाऱ्या एका महिलेच्या डोक्यावर वार करून खून केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत महिलेच्या भावाने याविषयी कामोठे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून तिच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार कऱण्यात आलेल्या विशेष पथकाने हत्या करणाऱ्या पाटील अटक केली आहे.
कामोठे येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्स, रूम नंबर ४०१, सेक्टर ११, येथे बिरप्पा श्रीरंग शेजाळ याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात कोणत्यातरी जड व टणक वस्तू डोक्यात मारून तिचा अत्यंत निर्घृण पद्धतीने खून केला असल्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा करून जागेवरच मोबाईल बंद करून गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारसह फरार झाला होता. त्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्यातील आरोपीस तत्काळ ताब्यांत घेण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार
गुन्हे शाखा कक्ष दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.संदीप गायकवाड, सपोनि.प्रविण फडतरे, पोउपनि मानसिंग पाटील, पोहवा काटकर, पोहवा सूर्यवंशी, पोहवा शिंदे, पोहवा अनिल पाटील,पोहवा रसाळ, पोना मोरे, पोहवा काणू, पोहवा निलेश पाटील, पोहवा रुपेश पाटील, पोहवा रणजीत पाटील, पोशी संजय पाटील, चापोहवा अजित पाटील यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.
सदर पथकाने सीसीटीव्ही कॅमेरे तसेच तांत्रिक तपासच्या आधारे सदर आरोपी हा आदमापुर ता. भुदरगड जि. कोल्हापूर येथे लपवून राहत असल्याचे निष्पन्न झाले होते. त्याठिकाणी सदर ठिकाणीं तात्काळ पथक रवाना करुन पळून जाण्याचा प्रयत्ननात असताना आरोपीला शिताफीने ताब्यांत घेतले. पोलिसांनी गुन्ह्याची चौकशी केली असता, त्याने पत्नीशी वारंवार होणाऱ्या घरगुती वादातून रागाच्या भरात डोक्यात हातोडी मारून तिचा खून केला कबुली दिली आहे. सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीकामी कामोठे पोलीस ठाणे याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Post a Comment