करंजाडे-वडघर येथील आरोग्य केंद्र पुन्हा सुरू करा- ठाकरे गटाच्या शिवसेनेची मागणी
पनवेल- पनवेल जवळील करंजाडे - वडघर आर २ याठिकाणी सिडकोमार्फत बांधण्यात आलेले आरोग्य केंद्र सद्यस्थितीत बंद आहे,सदर आरोग्य केंद्र पुन्हा सुरू व्हावे यासाठी रायगड जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली वडघर विभागप्रमुख श्री.नंदकुमार मुंडकर,करंजाडे युवासेना शहरप्रमुख श्री.निखिल भोपी ,युवासेना अधिकारी श्री.गौरव पांडे,गौरव पाटील यांच्या माध्यमातून पनवेल पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सदर अधिकाऱ्यांनी आठवड्यातून तीन दिवस डॉक्टर उपस्थित असतील असे आश्वासन दिले,सदर गोष्टींचा पाठपुरावा युवासेना करंजाडेच्यामार्फत सतत घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
Post a Comment