कळंबोलीत हिंदू-मुस्लिम एकात्मतेचे दर्शन ...
कळंबोली - हनुमान जयंतीनिमित्त झालेल्या महाप्रसाद भंडाऱ्यात मुस्लिम बांधवांना रोजानिमित्त इफ्तारचे आयोजन करून कळंबोलीत हिंदू मुस्लिम राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडले. हनुमान मंदीरात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार आयोजित करण्याची ही पनवेलमधील पहिलीच वेळ असल्यामुळे या उपक्रमाचे समाजातून कौतुक होते आहे.
बिमा कॉम्प्लेक्स येथील हनुमान मंदीरात दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. मुंबई लोहपोलाद बाजारातील व्यापारी, ट्रान्सपोर्ट व्यापाऱ्यांनी एकत्र येवून हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन केले होते. हजारो व्यापाऱ्यांची कार्यालये असलेल्या बिमा कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी हनुमान जयंतीच्या उत्सवात मुस्लिम बांधवांना विविध जातीधर्मांच्या लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी मुस्लिम बांधवांसाठी रमजाननिमित्त इप्तारचे आयोजन करून त्यांचा उपवास सोडण्याची व्यवस्था करण्याची सुचना केली. दोन समाजबांधवांना त्यांच्या धार्मिक कार्यासाठी एकत्र येण्याची संधी साधून आयोजकांनी तातडीने मुस्लिमबांधवांसाठी इप्तारचे आयोजन केले. हिंदू मुस्लिम समाजाने एकत्र येवून साजरा केल्या सणांना पनवेलचे सहाय्यक पोलिस आयुक्त भागवत सोनावणे यांनी आवर्जून हजेरी लावली.
हुनमान जन्मोत्सवानिमित्त रमजानसाठी इफ्तार आयोजन धार्मिक सलोखा राखण्याचे महत्वपुर्ण पाऊल आहे अशा शब्दांत सोनावणे यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुजर, व्यवसायिक सय्यद हवालदार, फारूक काझी आदींसह अनेकजण उपस्थित होते. उपस्थित होते. गुरूवारी सायंकाळी पार पडलेल्या या सामाजिक सलोखा जपणाऱ्या कार्यक्रमाची चर्चां कळंबोली नव्हे तर तालुक्यात अनेक ठिकाणी होती.
कळंबोलीतील स्टील मार्केट येथील हनुमान मंदिरात दर वर्षीप्रमाणे हनुमान जन्मोत्सव, भंडारा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. दोन धर्मात सलोखा निर्माण व्हावा म्हणून ज्या ठिकाणी हनुमानाचा भंडारा होतो त्याच ठिकाणी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे देखील आयोजन केले होते. मुस्लिम बांधवांनी भगवी शाल परीधान करुन, आरतीचे ताट हातात घेऊन आरती केली, या कृतीतून एकमेकांच्या धर्मांचा आदर करण्याचा मोठा संदेश समोर आला आहे. मुस्लिम बांधवांनी आमच्या निमंत्रणाचा आदर केल्याबद्दल त्यांचे आभार.
..... रामदास शेवाळे, संपर्कप्रमुख शिवसेना शिंदे गट
Post a Comment