उच्च शिक्षण शिष्यवृत्तीसाठी स्वदेस फाऊंडेशतर्फे संधी
अलिबाग (जिमाका) :- इयत्ता 12 वीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, माणगाव, सुधागड (पाली) या तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्वदेश फाऊंडेशनतर्फे उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
या शिष्यवृत्तीसाठी पात्रता पुढीलप्रमाणे :- 12 वीमध्ये किमान 60 टक्के मार्क, उत्पन्न 8 लाख 50 हजारच्या आत असले पाहिजे.
यासाठी मिळणारा लाभ- वार्षिक उत्पन्न, कॉलेज फी व वसतिगृह यांच्यानुसार 25, 40, 50, 60 आणि 75 टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँकेत, दोन हप्त्यात जमा होईल.
जिल्ह्यातील 12 वी च्यापुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि.15 एप्रिल 2023 पर्यंत
https://swadesmis.surveycto.com/collect/stage1excellence_scholarship_application_fy_2324?caseid=
या लिंकचा वापर करून फॉर्म भरावा.
अधिक माहितीसाठी स्वदेस फाऊंडेशनच्या बाळासाहेब माने - 9922495033 किंवा विनोद पाटील- 8379966767 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन स्वदेश फाऊंडेशनचे उपसंचालक तुषार इनामदार यांनी केले आहे.
Post a Comment