News Breaking
Live
wb_sunny Jul, 15 2025

Breaking News

  

कर्नाळा जवळ लाकडाने भरलेला ट्रक झाला आडवा

कर्नाळा जवळ लाकडाने भरलेला ट्रक झाला आडवा

पनवेल -  (संजय कदम) : पनवेल जवळील मुंबई- गोवा महामार्गावरील कर्नाळाच्या हद्दीत पहाटे कोकणातून ठाणे येथे जाण्यासाठी निघालेला लाकडाने भरलेला ट्रक पनवेल बाजूकडे येत असताना पलटी झाल्याने प्रमाणात वाहतूक कोडी झाली होती. 
                  कोकणातील खेड येथून ठाणे मुलुंड स्मशानभूमीसाठी लाकडे घेऊन जाणारा अशोक लेलँड ट्रक  पनवेल बाजूकडे भरधाव वेगाने जात असताना सदर ट्रकमधून ऑइल गळती होऊन ट्रकवरील चालकाचा ताबा सुटून ट्रक रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. त्यामुळे ट्रकमध्ये असलेली लाकडे रस्त्यावरच पसरली. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघाताची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचे पथक व वाहतूक शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हायड्राच्या सहाय्याने वाहतूक कोंडी मोकळी करण्यास सुरुवात केली आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. तर ट्रकचालक व त्याचा सहकारी सुखरूप असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांनी दिली आहे. 
फोटो : लाकडाने भरलेला ट्रक पनवेलजवळ झाला आडवा

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment