खारघरच्या स्वप्नपूर्तीत दूषित पाणी : माजी नगरसेवक हरेश केणी यांचा आंदोलनाचा इशारा
खारघर :- पनवेलजवळील खारघर शहरात सिडकोने उभारलेल्या सेक्टर 36 येथील स्वप्नपूर्ती गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशांना मागील दोन दिवसांपासून दूषित पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने व्यवस्थेविरोधात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.यामुळे नाईलाजास्तव येथील रहिवाशांना विकतचे पाणी प्यावे लागत आहे.
या सोसायटीत सुमारे 3500 फ्लॅट्स आहेत.हजारो रहिवासी याठिकाणी वास्तव्यास असताना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाकडून याबाबत ठोस उपाययोजना राबविताना दिसून येत नाहीत.संपूर्ण सेक्टर 35,36 मध्ये हीच परिस्थिती असल्याने येथील रहिवासी संतापले आहेत.नेमक कशामुळे हे दूषित पाणी येत आहे याबाबत सिडकोने खुलासा करण्याची मागणी रहिवासी करीत आहेत.
सिडकोने याबाबत लवकरात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास आम्हाला सिडको विरोधात मोर्चा काढावा लागेल असा ईशारा माजी नगरसेवक हरेश केणी यांनी दिला आहे.
Post a Comment