News Breaking
Live
wb_sunny

Breaking News

मुंबई - पुणे शेडुंग बायपास रस्त्याचे रुंदीकरण : बोर्ले ग्रामस्थांचे कामबंद आंदोलन

मुंबई - पुणे शेडुंग बायपास रस्त्याचे रुंदीकरण : बोर्ले ग्रामस्थांचे कामबंद आंदोलन

        पनवेल  : पनवेल तालुक्यातील बोर्ले ग्रामस्थांच्या न्यायहक्कासाठी ग्रामस्थ रस्त्यावर उतरले आहेत. त्याचबरोबर महामार्गच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामामुळे ग्रामस्थांना अडचणीना सामोरे जावे लागले असल्याने शनिवारी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन केले. आंदोलनाला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.


         यावेळी ग्रामपंचायत सदस्य घनश्याम महादेव पाटील, दिपीका दीपक कांबळे, माजी सदस्य गोविंद पाटील, दीपक कांबळे बाळकृष्ण पाटील भाऊराज् पाटील, गणेश् पाटील, वसंत पाटील ,जगन पाटील, सचिन पाटील विनोद गायकर, महिला ग्रामस्थ ताईबाई पाटील, कमल पाटील, संगीता पाटील असे बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.  
             पनवेल तालुक्यातील बोर्ले गावाजवळून मुंबई- पुणे शेडुंग बायपास द्रुतगती मार्गाचे रुंदीकरणाचे काम चालू आहे. सदर रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिण्याचे पाण्याचे विहिरीवर व कपडे धुण्यासाठी जावे लागणाऱ्या तलावावर व शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास व शेतावर मुरे (गाय, बैल, ग्लैस, बैलगाडा जाण्यास मोठी अडचण होण्याची संभावना आहे. तरी सदर कामाचे बोले ग्रामस्थ शेतकरी यांना चालू असणाऱ्या कामाचा त्रास भोगावा लागतो. यावेळी ग्रामस्थांना सदर कामाचे वस्तु स्थिती (कामाचे प्लॅन) आजपर्यंत आपल्याकडून लेखी स्वरूपात मिळालेला नाही.  


          त्याचबरोबर ग्रामस्थांच्या निदर्शनास येत आहे कि, बोर्ले गावाचा रस्त्याच्या रुंदीकरणामुळे पिण्याचे पाण्याचे विहिरीवर व कपडे धुण्यासाठी जावे लागणाऱ्या तलावावर व शेतकऱ्यांना शेतावर जाण्यास व शेतावर गुरे (गाय, बैल, म्हैस, बैलगाडा) जाण्यास मोठी अडचण होणार आहे. तरी एम.एस.आर.डी.सी. याबाबतची दखल घेत नाही,  त्या कारणाने ग्रामस्थांच्या अडचणीचे निवारण होईपर्यंत सर्व ग्रामस्थ रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन सुरु केले.

Tags

Newsletter Signup

Sed ut perspiciatis unde omnis iste natus error sit voluptatem accusantium doloremque.

Post a Comment