कोमसाप नवीन पनवेल शाखेचे पोपटी कवी संमेलन
पनवेल - कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्यावतीने पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक ५ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता सुकापुर येथील भगतवाडी (नवीन पनवेल) येथे या पोपटी कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या पोपटी कवी संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या माहिती संचालनालयाचे कोकण विभागाचे उपसंचालक डॉ.गणेश मुळे यांच्या हस्ते होणार असून या कवी संमेलनास कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख,रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील कोमसाप मुरुड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, कोमसाप कर्जत शाखेचे अध्यक्ष अॅड. गोपाळ शेळके,मराठी भाषा मंडळ अधिकारी डाॅ.आनंद गांगण, गजानन पाटील उपस्थित राहणार आहेत.
Post a Comment