जागतिक महिलादिनी थायरॉईड चेकअप शिबिर : जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचा आरोग्यसेवा उपक्रम
पनवेल-जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत थायरॉईड चेकअपचे आयोजन करण्यात आले आहे.
दिपक क्लिनिकल लॅबोरेटरीचे श्री.दिपक कुदळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ८ मार्च २०२३रोजी सकाळी ८ ते १ या वेळेमध्ये दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी डी.ए.व्ही. स्कूलजवळ, नवीन पनवेल येथे त्यासोबतच 8 मार्च ते 12 मार्च 5 दिवस शिबिर दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी, तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय, पनवेल समोर या ठिकाणी आयोजित केले आहे.
यावेळी तपासणी करणाऱ्या महिलांना जे.एम.
म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून एक आरोग्य सेवाकार्ड देण्यात येणार आहे ज्यामध्ये पुढील वर्षभरात रक्ताच्या विविध तपासण्या या कार्डच्या द्वारे सवलतीच्या दरात त्यांना करता येतील.
या शिबिरामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन आपली थायरॉईड टेस्ट करावी आणि आपले आरोग्य उत्तम राखावे असे आवाहन संस्थेच्यावतीने सौ.ममताताई प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.
थायरॉईड हे टेस्ट केल्यानंतरच महिलांना समजते ज्यावेळी त्याचे प्रमाण शरीरामध्ये वाढते त्याचवेळी महिला टेस्ट करतात निदान लवकर न झाल्यामुळे भविष्यात त्यांना त्रास होऊ शकतो या अनुषंगाने आम्ही गेली अनेक वर्ष महिला दिनानिमित्त महिलांसाठी सामाजिक बांधिलकीतून मोफत थायरॉईड चेकअप शिबिर ठेवून आरोग्यसेवा देत आहोत.
प्रीतम जनार्दन म्हात्रे
(अध्यक्ष, जे एम म्हात्रे चॅरिटेबल संस्था,
माजी विरोधी पक्षनेते, प.म.पा.)
Post a Comment